Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जळगाव पोलिसांचा दणका! १७ लाखांचा अवैध गुटखा व आयशर ट्रक जप्त; गुटखा माफियांवर धडक कारवाई

जळगाव पोलिसांचा दणका! १७ लाखांचा अवैध गुटखा व आयशर ट्रक जप्त; गुटखा माफियांवर धडक कारवाई

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

 

जळगाव:

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी जळगाव पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर चाळीसगाव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गुटखा तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. या संयुक्त कारवाईत पोलिसांना १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आणि दोघांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवर रचला जाळा

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलिसांचे निरीक्षक अमितकुमार मनेळ व त्यांच्या पथकाने चाळीसगाव येथील हिरापूर रोडवरील ‘विनोद किराणा स्टोअर्स’वर अत्यंत गोपनीय पद्धतीने छापा टाकला. तेथून प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी नचिकेत सुनील येवले याला ताब्यात घेण्यात आले.

त्याचप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या पथकाने जळगावच्या जुन्या बी. जे. मार्केट परिसरात सापळा रचला. तेथे संशयित आयशर ट्रक (क्र. MH-48-AY-1848) रोखून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाला आढळला. पोलिसांनी चालक मधुकर धोंडू इंगळे (रा. शिवनगर, जळगाव) याला तात्काळ ताब्यात घेतले.

जप्त केलेला ऐवज:

प्रतिबंधित गुटखा व पानमसाला: १,९९,८१८ रुपये

आयशर ट्रक (MH-48-AY-1848): १५,००,००० रुपये

* एकूण जप्त मुद्देमाल: १६,९९,८१८ रुपये

अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे (गुन्हा रजि. क्र. ४४१/२०२६) व जिल्हापेठ पोलीस ठाणे (गुन्हा रजि. क्र. ३१२/२०२६) येथे भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियमा’तील कडक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा विषारी माल कोठून आणला गेला आणि या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

“अवैध गुटखा, पानमसाला किंवा इतर बेकायदेशीर व्यवसायांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.”

श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव)

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]