जळगाव पोलिसांचा दणका! १७ लाखांचा अवैध गुटखा व आयशर ट्रक जप्त; गुटखा माफियांवर धडक कारवाई
जळगाव: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी जळगाव पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर चाळीसगाव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गुटखा तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. या संयुक्त कारवाईत पोलिसांना १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आणि दोघांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीवर रचला जाळा…