Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » गरोदर महिलेवर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार करणाऱ्या इन्स्पेक्टर आणि उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा.

गरोदर महिलेवर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार करणाऱ्या इन्स्पेक्टर आणि उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा.

Trending Photos

 

Ankush tv18 news

**सहकारनपूर (उत्तर प्रदेश):**उत्तर प्रदेशातील सहकारनपूरमधील देवबंद येथे ११ वर्षे जुन्या एका अत्यंत चर्चित आणि खळबळजनक प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. ६ ऑगस्ट २०१५ रोजी पोलीस ठाण्यात आपल्या पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या *२.५ महिन्यांच्या गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तत्कालीन ठाणे प्रभारी (इन्स्पेक्टर) बृजमोहन यादव आणि एसएसआय (दरोगा) वेदपाल सिंह यांना न्यायालयाने  आजीवन कारावासाची (जन्मठेप) शिक्षा सुनावली आहे.

काय होते नेमके प्रकरण?

 

६ ऑगस्ट २०१५ रोजी पीडित महिला अडीच महिन्यांची गर्भवती होती. तिचा पती एका खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये पाठवण्यात आला होता. पतीला सोडवण्याची भीक मागण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी ती देवबंद कोतवाली (पोलीस ठाणे) येथे गेली होती. मात्र, तिथे खाकी वर्दीची लाज लज्जा सोडत तत्कालीन थाना प्रभारी बृजमोहन यादव आणि एसएसआई वेदपाल सिंह यांनी शासकीय निवासस्थानी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा घृणास्पद प्रकार केला होता*११ वर्षे दिली एकटीने कायदेशीर लढाई**

 

या गंभीर प्रकरणात सुरुवातीला सीबी-सीआयडी (CB-CID) कडून आरोपींना क्लीन चिट मिळवण्यात आली होती. परंतु, पीडितेने याविरुद्ध अजिबात हार मानली नाही. तिने कोणतीही भीती न बाळगता तब्बल ११ वर्षे एकटीने हा कायदेशीर लढा कायम ठेवला

शेवटी न्यायालयाने दोन्ही दोषी पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत,”कानून के हाथ सबसे लंबे होते हैं”  (न्यायाचे हात सर्वांत लांब असतात) हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. या निकालामुळे पीडितेला उशिरा का होईना, पण न्याय मिळाला असून सर्वत्र या निकालाचे स्वागत होत आहे.

 

—

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]