Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जळगाव पोलीसांची ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ मोहीम; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

जळगाव पोलीसांची ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ मोहीम; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

ankush tv18 news network-

जळगाव (Vijay Danej ):जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळी होणारी अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्रास्त्रांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव पोलीस दलाने काल रात्री विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक कारवाईत ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०,००० रुपयांचा थकीत दंड वसूल करण्यात आला.

ही मोहीम दोन टप्प्यांत पार पडली. पहिला टप्पा रात्री ८ ते १२ या वेळेत, तर दुसरा टप्पा पहाटे ४ ते ७ या वेळेत राबविण्यात आला. शहरातील प्रमुख नाके व प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून वाहनांची काटेकोर तपासणी करण्यात आली.

तपासणीची प्रमुख ठिकाणे:
आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, भुसावळ नाका, अमळनेर स्टॉप (पारोळा) आदी ठिकाणी विशेष तपासणी करण्यात आली.

मोहीमेत सहभागी पथके:
या कारवाईत ४ आरसीपी (RCP) प्लाटून्स, गुन्हे शोध पथकाचे (DB) ४ प्लाटून्स तसेच शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

कारवाईतील प्रमुख मुद्दे:

  • अवैध वस्तूंची तपासणी: सर्व बसेसची सखोल झडती घेऊन चालक व वाहकांना अंमली पदार्थ, विनापरवाना शस्त्रास्त्रे किंवा प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक न करण्याचा इशारा देण्यात आला.
  • प्रवासी सुरक्षा: बसमधील फायर एक्स्टिंग्विशर, इमर्जन्सी एक्झिट यांसारख्या सुरक्षाविषयक सुविधांची पाहणी करण्यात आली.
  • दोन चालक नियम: लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ‘दोन चालक’ नियम अनिवार्य असल्याचे सांगून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला.
  • थकीत दंड वसुली: ई-चलन प्रणालीद्वारे तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांकडून २० हजार रुपयांचा दंड तात्काळ वसूल करण्यात आला.

वरिष्ठांचे मार्गदर्शन:
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (IPS), अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक (जळगाव) संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या धडक मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविल्या जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा