हैद्राबाद – प्रतिनिधी
हिंदी पत्रकार जर्नलिस्ट सोसायटी तेलंगाना आणि तेलंगाना प्रदेश काँग्रेस भाषाई अल्पसंख्यांक प्रकोष्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दर वर्षी प्रमाणे यंदा ही “हिंदी दिवसा निमित्त” विशेष पुरस्कार ,सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमात हिंदी भाषि पत्रकार,लेखक,समीक्षक, कवि यांची निवड केलेल्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
हा सोहळा हैदराबाद येथील प्रेस क्लब सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस चे सरचिटणीस व तेलंगाना राज्याचे प्रभारी श्री सचीन सावंत , तेलंगाना बी.सी.विकास आयोग सल्लागार श्री हनुमंतराव आमदार श्री कोदंड रेड्डी तसेच तेलंगाना हिंदी भाषा अध्यक्ष श्री शुक्ला प्रामुख्याने उपस्थितीत होते.
या मान्यवरांच्या हस्ते हैदराबाद निवासी आपल्या समाजाचे सुप्रसिद्ध कवि श्री मनोहर कोसंदर यांना सर्वोत्कृष्ट हिंदी भाषि कवि हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
*अभिनंदन सावजी*





