ankush tv18news network
रोहिणखेड (ता. मोताळा) – दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी नवजीवन विद्यालय, रोहिणखेड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरास बुलढाणा जिल्हाधिकारी श्री. प्रवीण देवरे, उपविभागीय अधिकारी श्री. संतोष शिंदे तसेच तहसीलदार सौ. सरिता पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून नागरिकांना मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांच्या महसूल विषयक अडचणींचे निराकरण करण्यात आले तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी RTI ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री. अनंता शेळके यांनी शिबिरात सहभागी होत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच दलित व शोषित घटकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जिल्हाभरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





