Ankush tv18 news -Adv.vijay Danej
ब्रेकिंग न्यूज
मुंबई | प्रतिनिधी
डिजिटल 7/12 प्रणालीचे जनक म्हणून ओळख असलेले रामदास हरिभाऊ जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या ते नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी तसेच सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या २२.५ टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी (Agreement) २२ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी १३ मे २०२६ रोजी सिडको कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली.
या प्रकरणात रामदास जगताप यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्याचे समोर आले असून, त्यालाही अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणाली प्रभावीपणे राबवण्यात रामदास जगताप यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यामुळे त्यांच्या अटकेमुळे महसूल विभागासह प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचाही तपास सुरू असून, पुढील चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.
रामदास जगताप यांचे मूळ गाव जांबुत, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असल्याची माहिती समोर आली आहे.





