Ankush tv18news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाज सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे सच्चर समिती व रंगनाथ मिश्रा समितीने मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा सविस्तर अभ्यास करून त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे, हैदराबाद गॅझेट मध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लिम समाजाच्या स्थितीबाबत उल्लेख असून, त्यावर आधारित आरक्षणाची तरतूद पूर्वी अस्तित्वात होती हे सिद्ध होते, म्हणून महाराष्ट्र राज्यात मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरी मध्ये आरक्षण देण्यात यावे या अनुषंगाने महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांच्या शिष्टमंडळांनी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन दिले यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे सल्लागार हाजी नदाफ, अकबर हुसेन खान साहेब, असलम खान, मुस्ताक जिकरे, हमीद काझी, नाहिद मुजावर, आदि यावेळी उपस्थित होते,