Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » TWJ असोसिएट्स प्रा.लि. प्रकरणात मुख्य संचालकांना अटक; 279 गुंतवणूकदारांची तब्बल 23.81 कोटींची फसवणूक

TWJ असोसिएट्स प्रा.लि. प्रकरणात मुख्य संचालकांना अटक; 279 गुंतवणूकदारांची तब्बल 23.81 कोटींची फसवणूक

Trending Photos

Ankush tv18 News- Adv.Vijay B. Danej

Jalgaon –

TWJ असोसिएट्स प्रा.लि. प्रकरणात मुख्य संचालकांना अटक; 279 गुंतवणूकदारांची तब्बल 23.81 कोटींची फसवणूक

जळगाव : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी TWJ असोसिएट्स प्रा.लि. पुणे या कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांना आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन 26 मे 2026 रोजी रात्री अटक करण्यात आली.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 165/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 316(2), 316(5), 61(2) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019 च्या कलम 21 व 23 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव येथील मिलींद शालिकराव पाटील यांनी सुरुवातीला कंपनीच्या संचालकांविरोधात तक्रार अर्ज दिला होता. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली असता, मिलींद पाटील हे TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखेचे फ्रँचायसी म्हणून काम पाहत असल्याचे समोर आले. ते गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून करारनामे करून देत होते तसेच त्यांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून शेअर मार्केट ट्रेडिंगची माहिती देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. विविध ठिकाणी सेमिनार आयोजित करून कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.

यामध्ये 279 गुंतवणूकदारांकडून 11 महिन्यांच्या मुदतीसाठी तब्बल 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपये जमा करण्यात आले. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला नाही. त्यामुळे फसवणूक, अपहार व विश्वासघात केल्याचे निष्पन्न झाले.

आधीच अनेक गुन्हे दाखल

TWJ कंपनीच्या संचालकांविरोधात यवतमाळ, रत्नागिरी, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथेही विविध पोलीस ठाण्यांमध्ये MPID कायद्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

श्रीनगर पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथील गुन्ह्यात समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांना 29 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत असताना जळगाव पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कस्टडीदरम्यान कंपनीच्या व्यवहारांसह मालमत्तेबाबत सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुंतवणूकदारांना आवाहन

TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखेत गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे जमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा