Ankush tv18 news network
Jalgaon
शिव कॉलनी परिसर सकल हिंदू समाजातर्फे भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्ताने शिवकाली स्टॉप येथून सजीव देखाव्यांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून वातावरण भक्तिमय व उत्साही झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख
वक्ते ह. भ. प. अंकुश महाराज मनवेलकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीने हिंदू धर्माचे महत्त्व, परंपरा व संस्कृती याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री गिरीश कुलकर्णी, जिल्हा सेवा मंडळ सदस्य यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान आणि ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर प्रकाश टाकला.
यावेळी हिंदू समितीचे अध्यक्ष श्री भरत दादा बराटे यांनी भगवद्गीतेचे महत्त्व विशद करत जीवनात तिच्या आचरणाची गरज अधोरेखित केली.
या संमेलनासाठी शिवकाली परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक व मनुष्यबळाच्या स्वरूपात मोठा हातभार लावला. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले.





