Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ देहविक्री करणाऱ्या महिलांचा कट्टा?

शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ देहविक्री करणाऱ्या महिलांचा कट्टा?

Ankush tv18 news network

जळगाव शहरात अनेक ठिकाणी देहविक्री व्यवसाय केला जातो. पोलीस कारवाई देखील करतात मात्र ते व्यवसाय सुरूच असतात. जळगाव शहरातील मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद आणि शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ देहविक्री करणाऱ्या महिलांचा कट्टा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून देहविक्री करणाऱ्या काही महिला शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली उभे राहून ग्राहक शोधत होत्या. बऱ्याचदा त्याठिकाणी असलेल्या बाकांवर त्या बसून असल्याने त्यानंतर तिथे कुणी इतर महिला येऊन बसल्या तर ग्राहक त्यांच्याकडे त्याच नजरेने बघत असतात. जिल्हा परिषद कर्मचारी किंवा कामनिमित्त त्याठिकाणी येणाऱ्या महिलांची त्यामुळे मोठी कुचंबना होत असते.

 
शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली जुन्या जिल्हा परिषद इमारतीच्या समोर असलेले सर्व बाक गेल्या आठवड्यात मनपाने हटवले होते. बाक हटवल्यानंतर देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपला कट्टा देखील दुसरीकडे वळवला. सध्या जनता सहकारी बँकेच्या गल्लीत कोपऱ्यावर ३-४ महिला बसून असतात. शहर पोलीस ठाणे तिथून हाकेच्या अंतरावर आहे.

देह विक्री करणाऱ्या महिला ग्राहक शोधून जवळच असलेल्या एखाद्या लॉजचा आसरा घेतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून शहर पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाई कधी करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा