ankush tv18 news network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

स्वराज्य शासन व साजिर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा पुणे घोले रोड क्षेत्रीय कार्यालय पं. जवाहरलाल नेहरू सभागृहांमध्ये समाज कल्याण पुणे चे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे व नगरसेविका पल्लवी जावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार हे होते. यावेळी पांडुरंग शेलार म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीयांच्या सक्षमी करण्यासाठी आणि त्यांना सन्मान अधिकार मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले तसेच पुढे म्हणाले बाबासाहेबानी संविधानात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क दिले. महात्मा ज्योतीराव फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक न्याय विरुद्ध अत्यंत मोलाचे कार्य केले त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला असे आपल्या भाषणामध्ये सांगितले.
यावेळी दलित पॅंथर चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे, स्वराज्य शासन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उज्वला ताई भोसले, मयूर घारे, आदि यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा