Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » लिव्हिन आणि पॉक्सोचा गैरवापर-लिव्ह-इन संपल्यावर लगेचच पॉक्सो आणि बलात्काराचे गुन्हे नोंदवीणे पुरेसे नाही.-

लिव्हिन आणि पॉक्सोचा गैरवापर-लिव्ह-इन संपल्यावर लगेचच पॉक्सो आणि बलात्काराचे गुन्हे नोंदवीणे पुरेसे नाही.-

Trending Photos

Ankush tv18 news network

लिव्हिन आणि पॉक्सोचा गैरवापर -प्रकरण तपशील – Criminal Appeal No. 3529 of 2024

crlaa35292024allhc-1767056

आजच्या काळात प्रेमसंबंध, लिव्ह-इन आणि परस्पर संमतीने सहवास या गोष्टी समाजात वेगाने वाढत आहेत. मात्र असे संबंध तुटल्यानंतर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे — विशेषतः बलात्कार, पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होताना दिसतात. असेच एक महत्वाचे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात पोचले होते.

प्रकरणाची पार्श्वभूमी

पीडितेच्या आईने गुन्हा दाखल करून आरोप केला की, आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले, लग्नाचे आमिष दाखवले, बंगलोरला नेऊन शारीरिक संबंध ठेवले, गर्भधारणा झाली आणि नंतर जात दाखवून हाकलून दिले. विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते.आणि त्याला 20 वर्षांची शिक्षा + जन्मठेप सुनावली होती. त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.

उच्च न्यायालयाची निरीक्षणे

१. घटना घडली तेव्हा पीडीत अल्पवयीन होती का?, ती आरोपीसोबत जबरदस्तीने गेली होती का, की स्वेच्छेने?, शारीरिक संबंध संमतीने होते का? पॉक्सो आणि एस.सी. एस.टी. कायदे लावणे कायदेशीरदृष्ट्या योग्य होते का? हे महत्वाचे प्रश्न आहेत.
२.गुन्ह्यात पीडितेचे वय १८.५ वर्षे नमूद, नंतर साक्षीत ते १७ वर्षे सांगितले.शाळेच्या दाखल्याला कोणताही मूळ जन्मदाखला आधार नव्हता. वैद्यकिय तपासणीनुसार पीडिता सुमारे 20 वर्षांची होती.
३.त्यामुळे पीडिता सज्ञान असल्याने आणि एकदा वय 18 पेक्षा जास्त ठरल्यावर पॉक्सो कायदा आपोआप लागू होत नाही.
४.स्वेच्छेने आरोपीसोबत गेल्याचे, बस, ट्रेन, सार्वजनिक ठिकाणी, पोलीस दिसूनही तिने कधीही मदत मागितली नसल्याने आणि ६ महिने आरोपीसोबत बंगलोरमध्ये राहिली हे पीडितेने स्वतः मान्य केले आहे.
५.पीडिता सज्ञान असल्याने, संबंध संमतीने होते का? एवढाच प्रश्न फक्त राहतो.
६.तिचे दीर्घकाळ आरोपीसोबत राहणे, कुठेही तक्रार न करणे, स्वतःहून परत येणे — या सर्व बाबींवरून न्यायालयाने ठरवले की: त्यांच्यातील संबंध सहमतीने होते पॉक्सो आणि बलात्कार दोन्हीतील दोषसिद्धी बेकायदेशीर ठरते.
७.आज लिव्ह-इन संबंध वाढत आहेत. असे संबंध अपयशी ठरल्यानंतर अनेक वेळा फौजदारी तक्रारी दाखल होतात आणि महिलांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या कायद्यांचा गैरवापर होतो.

उच्च न्यायालयाचा निकाल

सर्व दोषसिद्धी रद्द, खालच्या न्यायालयाचा निकाल रद्द

निकालाचे महत्व

पॉक्सो कायद्यात वयाचा पुरावा सर्वोच्च महत्वाचा आहे, सज्ञान व्यक्तींमधील संबंधात सहमती निर्णायक आहे आणि लिव्ह-इन संपल्यावर लगेचच पॉक्सो आणि बलात्काराचे गुन्हे नोंदवीणे पुरेसे नाही.

प्रकरण तपशील – Criminal Appeal No. 3529 of 2024

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा