ANKUSH TV18 NEWS NETWORK
JALGAON
जळगाव रेल्वे स्टेशन – दादराजवळ मृत्यूचा सापळा !
काम सुरू असताना ना लाल झेंडा, ना बॅरिकेड्स, ना लाईट
अंधारात प्रवासी खड्ड्यात पडत असल्याची चर्चा -अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का?
जळगाव शहर रेल्वे स्टेशन परिसरात दादराजवळ सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेला मोठा व भयानक खड्डा हा सध्या प्रवाशांसाठी अपघाताचे आमंत्रण ठरत आहे. विशेष म्हणजे या खड्ड्याजवळ लाल रंगाचा झेंडा, बॅरिकेड्स अथवा अपूर्ण प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधारात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
रेल्वे स्टेशन हे शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून रात्रीच्या वेळेस महिला, वृद्ध, विद्यार्थी व बाहेरगावी जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र सदर खड्ड्याची कोणतीही ठोस सूचना, चेतावणी फलक किंवा सुरक्षितता उपाययोजना नसल्यामुळे अनेक प्रवासी अंधारात खड्ड्यात पाय पडून तोल जाऊन पडल्याच्या घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.
If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.
स्थानिक नागरिक व प्रवाशांचे म्हणणे आहे की,
“काम सुरू असेल तर किमान लाल झेंडा, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स किंवा पुरेशी लाईट व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कुठल्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो.”
या ठिकाणी एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रेल्वे प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांनी तातडीने दखल घेऊन खड्डा बुजवणे किंवा योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करणे अत्यावश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे.
जर वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.
#JalgaonRailwayStation
#दादराजखड्डा
#PassengerSafety
#रेल्वेप्रशासनजागेहो
#JalgaonNews
#PublicSafetyAtRisk
#अपघातासआमंत्रण
#लालझेंडाकुठेआहे
#CitizenAlert






Subscribe to my channel