Ankush tv18 news network
Jalgaon

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागातील फिर्यादी महिला दुचाकी वाहनाने घरी आले असता मागुन आलेल्या अज्ञात दुचाकी स्वारांनी फिर्यादीच्या गळयातील सोनसाखळी पोत ची जबरी चोरु करुन गेल्याने दि. 16/11/2025 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरन 849/2025 ‘भा.न्या.सं. 2023 चे कलम 309 (4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमिदारांकडून गोपनिय बातमी काढून सदर गुन्हा करणा-या आरोपीतांची ओळख पटवुन सदर आरोपीतांची माहिती काढून सदर गुन्हा करणारे आरोपीतास जळगाव शहरातील माऊली नगर भागात सापळा रचुन शिताफीने दि. 18/11/2025 रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने त्यांचे नाव तेजस अनिल ईखनकर रा ज्ञानदेव नगर जळगाव असे सांगुन त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे प्रसाद उर्फ परेश संजय महाजन, रा ज्ञानदेव नगर जळगाव याचेसोबत मिळुन केला असले बाबत सांगितले. सदर आरोपी प्रसाद उर्फ परेश संजय महाजन हा शनिपेठ पोलीस स्टेशन कडील दाखल खुनाच्या गुन्हा घडल्यापासुन मिळुन आला नव्हता. सदर आरोपी नामे प्रसाद उर्फ परेश संजय महाजन यास दि. 19/11/2025 रोजी माऊली नगर भागातुन ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीतांकाकडून जबरी चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 8 ग्रॅम सोन्याची लगड 80,000/- रुपये किंमतीची हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव चे पोनि बबन आव्हाड यांनी आवश्यक सुचना देवुन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकों नितीन ठाकुर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठे, पोकों चेतन पाटील अशांनी केली आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.





