Ankushtv18news network
अकोट प्रतिनिधी | दहीहंडा

दहीहंडा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री गोपाल ढोले साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अकोट तालुका परिसरातील पत्रकार बांधव व सामाजिक प्रतिनिधींशी सौजन्यपूर्ण भेट घेतली. या भेटी दरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील कार्य, कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चा तसेच पुढील काळातील पोलीस-प्रशासन व पत्रकार यांच्यातील सहकार्याबाबत संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते:
अंकुश टीव्ही जिल्हा प्रतिनिधी — नीलकंठ वसू पाटील
साम टीव्ही — श्री अक्षय गवळी आज तक — धनंजय साबळे ए.बी.पी. माझा — श्री उमेश अलोणे दिव्य मराठी — श्री गणेश बोरचाटे , रयत शेतकरी संघटना अध्यक्ष — श्री पूर्णाजी खोडके ,. प्रभाकर बोरकर , बाळासाहेब दामधर , विनोद भाऊ वसू नीलकंठ वसू , श्री बघेभाऊ (नखेंगाव उपासरपंच) रवी पाटील वसू नवनियुक्त ठाणेदारांनी उपस्थितांना पोलिस प्रशासनाकडून मिळणाऱ्या तात्काळ सहकार्याची हमी दिली व शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
दहीहांडा पोलिस स्टेशनमध्ये सदर सौजन्य भेटीमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात पोलीस-प्रशासन व माध्यम क्षेत्र यांच्यात अधिक प्रभावी संवादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





