Ankush tv18 news network
अहिल्यानगर–


अहिल्यानगर तालुक्यातील निर्भय सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी सरकारी कार्यालयांत नागरिकांना फोटो–व्हिडिओ करण्यास रोखण्याच्या प्रकारांविरोधात दिलेल्या धडक निवेदनाने प्रशासनाला हलवले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब रघुनाथ गीते यांनी तत्काळ आदेश प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये “चित्रीकरण नको” अशी मनमानेल ती मनाई करून नागरिकांना दडपण्याच्या प्रयत्नांचा पाचपुते यांनी चांगलाच समाचार घेतला. संविधानातील कलम 19(1)(a), RTI कायदा आणि सर्वोच्च न्यायालयीन निर्णयांचा पाढा वाचून त्यांनी प्रशासनाला स्पष्ट बजावले —
“गैर-गोपनीय जागेत चित्रीकरण रोखणे म्हणजे नागरिकांचा मूलभूत अधिकार तोडणे!”
प्रशासन आता शहाणे झाले असून—
✔ सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर चित्रीकरण नियमावलीचा मोठा फलक लावण्याचे निर्देश
✔ गोपनीय/सुरक्षा विभागांचे स्पष्ट मर्यादाबंधन
✔ आणि नागरिकांना जागे करण्यासाठी माध्यमांतून जनजागृती मोहीम
असे आदेश तयार केले जात आहेत.
हा निर्णय लागू झाल्यास कर्मचारी–नागरिकांतील वाद, धमक्या, दडपशाही आणि गोंधळ आटोक्यात येणार हे निश्चित.
“सरकारचा कारभार म्हणजे जनता पाहू नये अशी मालकी नाही,” असे म्हणत पाचपुते यांनी पुन्हा स्पष्ट केले की ते या विषयावर पूर्ण लढा देणार आहेत.





