Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले – आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखेने, केला धुळे जिल्ह्यातुन जेरबंद….. ३ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली

मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले – आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखेने, केला धुळे जिल्ह्यातुन जेरबंद….. ३ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली

Trending Photos

ANKUSH TV18 NEWS NETWORK

JALAGAON- CRIME NEWS –

मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखेने, केला धुळे जिल्ह्यातुन जेरबंद…..

पारोळा पोलीस स्टेशन गुरनं ३०७/२०२४ भा.न्या.सं.३०३ (२) प्रमाणे मोटार सायकल चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरुन   मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.

त्यावरुन मा.श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु विन्हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पो. अं. रावसाहेब पाटील, चालक दिपक चौधरी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वर नमुद पथकातील अमंलदार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत लामकाणी ता-जि-धुळे येथील १) मनोज पाडुरंग गायकवाड हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे बरेच दिवसापासून त्यांचे मागावर होते. वर नमुद पथकातील अमंलदार यांनी मनोज गायकवाड हा त्याचे गावी लामकाणी ता-जि-धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास लामकाणी ता-जि-धुळे येथून ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता वर गुन्ह्यातील एक होन्डा शाईन कंपणीची मोटार सायकल व दोन युनिकॉन कंपणीचे काळ्या रंगाचे मोटार सायकल असे एकुन ३ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने वरील ३ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत पारोळा पो. स्टे तसेच जळगांव तालुका पो. स्टेला गुन्हा दाखल केलेला आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.  सदरची कारवाई ही.मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.    सदरची कारवाई पोउ.निरी. श्री जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु बि-हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील, चालक दिपक चौधरी सर्व नेमणुक. स्था.गु.शा जळगांव अशांनी केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा