Ankushtv18news network

जळगाव शहरातील शिवराम नगर येथील माजी मंत्री मा. आमदार श्री. एकनाथराव खडसे यांचे मुक्ताई या निवासस्थानी दिनांक २७/१०/२०२५ रोजी सायं. ०७.०० ते दि.२८/१०/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजेचे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोंडा तोडुन घरफोडी केली त्यात चोरी झालेला मुददेमाल खालील प्रमाणे ;
१) ८०,०००/- रूपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची गहु पोत जुवाकिअ.
२) १६,०००/- रूपये किमतीची ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग जुवाकिअ.
३) १२,०००/- रूपये किमतीची ०३ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग जुवाकिअ.
४) १६,०००/- रूपये किमतीची ०४ ग्रॅम वजनाचे डायमंड सोन्याची कर्णफुल जुवाकिअ.
५) १२,०००/- रूपये किमतीची ०३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जुवाकिअ.
६) १६,०००/- रूपये किमतीची ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जुवाकिअ.
७) ४०,०००/- रूपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची गोफ जुवाकिअ.
८) ८०,०००/- रूपये किमतीची प्रत्येकी ०५ ग्रॅम एकुण २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ०४ अंगठ्या जुवाकिअ.
९) ५०,०००/- रूपये किमतीची ०१ किलो वजनाची चांदीची गदा जुवाकिअ.
१०) ५०,०००/- रूपये किमतीची ०१ किलो वजनाची चांदीची त्रिशुल जुवाकिअ
११) १,००,०००/- रूपये किमतीची ०२ किलो वजनाची चांदीची तलवार जुवाकिअ
१२) ६०,०००/- रूपये किमतीची ०१ किलो २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ०६ ग्लास जुवाकिअ
१३) ३,०००/- रूपये किमतीची ०६ भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट जुवाकिअ
१४) १,००,०००/- रूपये किमतीची ०२ किलो वजनाचे चांदीचे रथ जुवाकिअ
१५) ३५०००/- रुपये रोख त्यात भारतीय चलनाच्या विविध दराच्या नोटा
एकुण ०६,७०,०००/- रु. किमतीचा मुददेमाल
सदर घटनेबाबत घराची देखभाल करणारे फिर्यादी श्री चेतन सुरेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारी वरुन दि.२८/१०/२०२५ रोजी रामानंद नगर पोस्टेस गुरनं ३६७/२०२५ BNS कलम ३०५ (अ), ३३१ (३) ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात तपास :- मा.श्री. महेश्वर रेडडी सो, मा. पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री अशोक नखाते सो, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव मा. श्री नितीन गणापुरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पथक यांचे कडुन सदर गुन्हयातील आरोपींचा कसुन शोध सुरु होता.
दरम्यान पोलीसांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन सदर गुन्हयात चोरटयांनी वापरलेली दुचाकी शोधुन काढली व वाहन मालक नामे जियाउददीन हुस्नोददीन शेख वय-३९ रा. मास्टर कॉलनी जळगाव यास विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे ०३ नातेवाईक नामे मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी व एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी व बाबा (पूर्ण नाव माहीत नाही.) सर्व राहणार उल्हासनगर, मुंबई. अश्यांनी केल्याची माहीती दिली. त्यावरुन गुन्हा करुन पसार झालेल्या मुख्य आरोर्पीचा रामानंद नगर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत मुंबई येथे जावुन शोध सुरु करण्यात आला.
[19:51, 03/11/2025] Ankush Tv18 News: आरोपीत १) जियाउददीन हुस्नोददीन शेख वय-३९ रा. मास्टर कॉलनी जळगाव याने आरोपींना गुन्हयात मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि. ३०/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन गुन्हयातील दुचाकी सुझुकी कंपनीची बर्गमन वाहन क्र. MH-१९-ER-५५३९ जप्त करण्यात आली आहे.
तसेच मुख्य आरोपींचा शोध घेत असतांना गुन्हयातील मुददेमाल एका सोनाराकडे विक्री झाल्याची गुप्त माहीती मिळाली असता, विक्री करणार इसम नामे चिराग इकबाल सैय्यद वय-२२ रा. उल्हासनगर यास ताब्यात घेवुन सदरचा मुददेमाल विकत घेणार सोनार नामे कैलास हिराचंद खंडेलवार वय-४८ रा. कल्याण यांचा पथकांनी कसुन तपास केला असता, त्यांनी गुन्हयातील मुददेमाल काढुन दिला आहे. करीता आरोपी २) चिराग इकबाल सैय्यद वय-२२ रा. उल्हासनगर व आरोपी ३) कैलास हिराचंद खंडेलवार वय-४८ रा. कल्याण यांना दि.०३/११/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन, गुन्हयातील आरोपी क.०२ व ०३ यांनी तपासात खालील प्रमाणे मुददेमाल काढुन दिलेला आहे.
१) ३१.९७० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड,
२) ३.०३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग जुवाकिअ.
३) ३.२२० ग्रॅम वजनाचे डायमंड सोन्याची २ कर्णफुल जुवाकिअ.
४) २,००० ग्रॅम वजनाची सोन्याची गोलरिंग
५) ४.४९० ग्रॅम वजनाची सोन्याची ०१ अंगठी
६) ३.९९० ग्रॅम वजनाची सोन्याची २ कर्णफल
७) ८.४३० ग्रॅम वजनाची सोन्याची ०१ चैन व पेंडल
८) ३.११० ग्रॅम वजनाची सोन्याचे गोल कडे
९) २१७.४०० ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मुर्ती
असा ६,२४,०००/-रु.किचा सोन्याचे दागीने व २१,०००/- रुपये किमतीची चांदीची मुर्ती असा एकुण ०६,२१,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात पाहीजे आरोपी नामे १) मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी २) एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी व आरोपी ०३) बाबा (पुर्ण नाव माहीत नाही.) सर्व राहणार उल्हासनगर, मुंबई. यांचा शोध सुरु असुन, यातील एजाज अहमद यांचे विरुध्द माटुंगा, व्हिपी रोड, नारपोली, ताडदेव, नवपाडा वापी अशा विविध पोस्टेला चोरी घरफोडीचे सुमारे २० गुन्हे दाखल असुन मोहम्मद बिलाल व एजाज अहमद याचे विरुध्द अर्बन पोस्टे मुंबई, MIDC पोस्टे मुंबई, ताडदेव अशा पोस्टेला घरफोडीचे गुन्हे दाखल असुन त्यांचा शोध सुरु आहे.
नमुद गुन्हयाचे तपासात मा. श्री. महेश्वर रेडडी सो, पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्री अशोक नखाते सो, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा.श्री नितीन गणापुरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग जळगाव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/ राहुल गायकवाड स्थागुशा व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, रामानंद नगर पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोस्टेचे पोउपनि सचिन रणेशवरे, पोह सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, विनोद सुर्यवंशी, पोना/ हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, मनोज सुरवाडे, अतुल चौधरी, पोशि/गोविंदा पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि / शरद बागल, शेखर डोमाळे, पोह/अक्रम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, पोशि/रविंद्र कापडणे, राहुल रगडे, दिपक चौधरी, बबन पाटील, प्रदीप चौरे, महेश सोमवंशी, कुंदनसिंग बयास आदींचे पथकाने कामकाज करुन गुन्हा गुन्हयातील आरोपी अटक करुन मुददेमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि/राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि सचिन रणेशवरे नेम- रामांनद नगर पोस्टे हे करीत आहेत.





