ANKUSH TV18NEWS NETWORK
JALGAON
प्रखर राष्ट्रवादी, अंत्योदयाचे प्रणेता स्व. पंडित दीनदयालजी उपाध्यय यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छतेतून समृद्धी, स्वच्छतेतून प्रगती, चला आपण सर्व मिळून स्वच्छता आणि निरोगी भारत निर्माण करू स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करू.. या संकल्पनेतून भाजप जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान शहरातील रेल्वे स्थानक परिसरात खा. श्रीमती स्मिताताई वाघ, आ सुरेश दामू भोळे (राजू मामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी, जळगाव पश्चिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता करून राबविण्यात आला..
तर याप्रसंगी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जयेश भावसार, उदयजी भालेराव, सेवा पंधरवडा अभियान संयोजक विजय वानखेडे, स्वच्छता अभियान संयोजक राजेंद्र मराठे, भगत बालानी, अशोक राठी, संतोष इंगळे, सौ. भाग्यश्रीताई चौधरी, दीपक परदेशी, भूषण लाडवंजारी, अॅड. शुचिता ताई हाडा, डॉ. वीरण खडके, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, सौ दीपमालाताई काळे, विनोद मराठे, अतुल बारी, महेश चौधरी, सौ.संगीता पाटील, भरत सपकाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.