Home » महाराष्ट्र » अंकुश टीव्हीच्या अकोट प्रतिनिधी पुढाकारातून अकोट शहर पोलीस स्टेशनसमोर कामगारांना चहा व नाश्त्याचे वाटप-

अंकुश टीव्हीच्या अकोट प्रतिनिधी पुढाकारातून अकोट शहर पोलीस स्टेशनसमोर कामगारांना चहा व नाश्त्याचे वाटप-

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

अकोट | प्रतिनिधी रेणुका देशमुख   प्रतिनिधी (अंकुश टीव्ही)

महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त अकोट शहरात सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी कामगारांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. अंकुश टीव्हीच्या अकोट प्रतिनिधी रेणुका देशमुख यांच्या पुढाकारातून अकोट शहर पोलीस स्टेशनसमोर कामगारांना चहा व नाश्त्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून दिवसभर कष्ट करणाऱ्या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्यात आला. या छोट्याशा उपक्रमामुळे कामगारांना थोडासा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमावेळी उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम अधिकाधिक राबविण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी बोलताना रेणुका देशमुख यांनी सांगितले की, कामगार दिन हा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष मदतीच्या स्वरूपात साजरा करणे आवश्यक आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]