Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » “उज्वल मोटार ड्रायव्हिंग स्कूल” आणि संबंधित मोटार वाहन निरीक्षकांविरोधात कारवाईची मागणी ?

“उज्वल मोटार ड्रायव्हिंग स्कूल” आणि संबंधित मोटार वाहन निरीक्षकांविरोधात कारवाईची मागणी ?

Trending Photos

ANKUSH TV18 NEWS –ADVOCATE- VIJAY B.DANEJ

वाहन क्रमांक MH-04-P-3990 हे वाहन मोहाडी येथे भंगार व बंद अवस्थेत उभे असतानाही त्याच वाहनावर परिवहन संवर्गातील उमेदवारांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवून तब्बल ४१ परिवहन परवाने मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप 

Anil Adakmol यांनी RTO, Jalgaon यांच्याकडे गंभीर तक्रार दाखल करत Chopda येथील “उज्वल मोटार ड्रायव्हिंग स्कूल” आणि संबंधित मोटार वाहन निरीक्षकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

जळगावमध्ये परिवहन विभागाशी संबंधित गंभीर तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक यांनी आरटीओकडे दिलेल्या तक्रारीनुसार, वाहन क्रमांक MH-04-P-3990 हे वाहन मोहाडी येथे भंगार व बंद अवस्थेत उभे असतानाही त्याच वाहनावर परिवहन संवर्गातील उमेदवारांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवून तब्बल ४१ परिवहन परवाने मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत संबंधित वाहनाची PUC मुदत संपलेली असल्याचा तसेच वाहनावर HSRP नंबर प्लेट नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षण प्रक्रियेची वैधता, वाहनाची प्रत्यक्ष स्थिती आणि परवाना मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून मंजूर करण्यात आलेले परवाने, प्रशिक्षण नोंदी, वाहन तपासणी अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १४ आणि १५ चे उल्लंघन करून तब्बल ४१ उमेदवारांना प्रत्यक्ष वाहन चालविण्याची चाचणी न घेता पक्के अनुज्ञप्ती (Driving Licence) मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की:

  • आवश्यक ३० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले नाही
  • नियमबाह्य पद्धतीने फॉर्म क्रमांक ५ जारी करण्यात आले
  • संबंधित मोटार वाहन निरीक्षकांनी प्रत्यक्ष चाचणी न घेता परवाने मंजूर केले

तक्रारदाराने प्रशासनाकडे:

  • संबंधित ४१ परवाने रद्द करणे
  • संबंधित मोटार वाहन निरीक्षकांना निलंबित करणे
  • “उज्वल मोटार ड्रायव्हिंग स्कूल, चोपडा” यांची मान्यता रद्द करणे
  • संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे      अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत माहितीनुसार, जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (MH-19) हे आदर्श नगर, एस.पी. चौक परिसरात कार्यरत आहे.  या आरोपांमुळे परिवहन विभागातील प्रशिक्षण व परवाना प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रकरणाची सखोल चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   या तक्रारीमुळे परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार, ड्रायव्हिंग चाचणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा