Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » काँग्रेसच्या इंटकमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी सामील व्हावे – प्रदेशाध्यक्ष ॲड. सुभाष माछरे आवाहन

काँग्रेसच्या इंटकमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी सामील व्हावे – प्रदेशाध्यक्ष ॲड. सुभाष माछरे आवाहन

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

पुणे | प्रतिनिधी

कामगारांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काँग्रेसच्या इंटकमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी सामील व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष ॲड. सुभाष माछरे यांनी केले. भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) पुणे जिल्हा कमिटी पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्ती पत्र वितरणाचा कार्यक्रम डेक्कन येथील हॉटेल रविराजमध्ये उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात इंटकचे पुणे शहराध्यक्ष इमरान शेख, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्ण माने, शहर महिला अध्यक्षा मुमताज शेख, जिल्हा कार्याध्यक्ष आलिशा बुद्धिवंत, जिल्हा उपाध्यक्ष रेखा माने, जिल्हा सचिव मेघा शेगर, तसेच प्रभाग क्रमांक ४१ चे अध्यक्ष अविनाश कसबे यांना पदनियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. ही पत्रे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुभाष माछरे यांच्या हस्ते देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. धनंजय बुद्धिवंत यांनी केले होते. यावेळी प्रदेश महासचिव शिवाजीराव म्हस्के, शिवाजीराव गायकवाड, सचिव प्रकाश घोळवे, सुवर्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. माछरे म्हणाले की, इंटक ही काँग्रेस पक्षाची कामगारांसाठी लढणारी संघटना असून ती कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम इंटकच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे राज्यभरातील कामगार, मजदूर आणि कार्यकर्त्यांनी आपल्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी इंटकमध्ये सामील व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]