Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
ससून सर्वोपचार रुग्णालय मध्ये नोकर भरती होणार आहे त्यामध्ये मागासवर्गीय समाजातील सर्वात उपेक्षित वंचित घटक म्हणून मेहतर वाल्मिकी समाजातील लोकांना प्राधान्य द्यावा नुकतेच शासनाने वर्तमानपत्र मध्ये जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते त्या अनुषंगाने , मॅन्युअल स्केव्नजर कमिटी मेंबर (शासकीय) पुणे (ससून सर्वोपचार रुग्णालय समिती सदस्य )नरेश इन्द्रसेन जाधव यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली, वर्षानुवर्ष सफाई कर्मचारी म्हणून मेहतर समाज ओळखला जातो त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे या नोकर भरतीमध्ये मेहतर वाल्मिकी समाजाचा लोकांना प्रथम प्राधान्य द्यावे असे निवेदनामध्ये म्हटले आहे,
यावेळी महेंद्र लालबिगे, नरेंद्र चव्हाण, दिनेश सोळंकी, राजेश चव्हाण, सचिन साळुंखे, आदि यावेळी उपस्थित होते,