karad-( news)
सध्या नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू असून अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेवली आहे. असे असतानाही कराड शहरात मटका आणि जुगाराचे अवैध अड्डे बिनदिक्कतपणे आणि खुलेआम सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी आणि आंदोलने होऊनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
KARAD DYSP- RAJESHRI PATIL – मटक्याच्या चिठ्ठ्यांचा थेट पुरावा उघड
कराड शहरात मटका व जुगार अड्डे कसे जोमात सुरू आहेत, याचे ताजे पुरावे हाती आले आहेत. ‘कल्याण’ आणि ‘मेन बाजार’ यांसारख्या मटक्याचे जुगार आकडे नमूद केलेल्या चिठ्ठ्या या अवैध धंद्यांची साक्ष देत आहेत. दिवसाढवळ्या चालणाऱ्या या धंद्यांमुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा जुगाराच्या पेल्यात आणि अड्ड्यावर उधळला जात आहे.
[प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
[हे सगळं उघडपणे सुरू असताना कराड शहरचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे नेमके काय करत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारवाई शून्य असल्याने मटकवाल्यांना जणू “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!” असा अभय प्रशासनाकडूनच देण्यात आला आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. DYSP साहेब आणि खाकी वर्दीला शहरात चाललेलं हे थैमान दिसत नाही का? किंवा या सगळ्याला त्यांचाच मूक पाठिंबा आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
गरिबांच्या संसाराची राख आणि तीव्र आंदोलनाचा इशारा
या अवैध व्यसनापायी तरुणाई उद्ध्वस्त होत असून, गरिबांच्या संसाराची राख होत आहे. कष्टकऱ्यांच्या बायका-मुलांच्या तोंडाचा घास हिरावला जात असताना यंत्रणा कसली दिवाळी साजरी करणार, असा परखड सवाल केला जात आहे. आता यापुढे गप्प बसून चालणार नाही असा इशारा देत, जिथे हे अवैध धंदे सुरू आहेत तिथे थेट संबंधितांचे फोटो लावून “मैं हूँ ना – भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” असे फलक जनता आणि नागरिकांमार्फत स्वतः त्या-त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. या मुजोर प्रशासनाचा खरा चेहरा आता उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कराड शहरातील मटका व जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.




