Ankush tv18 news – Advocate vijay danej
सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी परिसरात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या १० जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून पाच महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख देवेंद्र उर्फ गोट्या दिगंबर ढोणे (वय ३१, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यासह प्रतीक सुरेश कोळी, पराग गणेश निवळे, गणेश उर्फ गोट्या दत्तात्रय कणसे, संकेत मधुकर आठवले, आदित्य दीपक पोळ, यश राजेंद्र येवले, चैतन्य ज्ञानेश्वर उईके, यश संजय बिडकर आणि प्रकाश उर्फ दादा आनंदराव खरात या सदस्यांचा समावेश आहे.

सदर टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून दमदाटी करणे, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. टोळी सदस्यांवर वेळोवेळी अटक व प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली.
त्यानंतर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या समोर सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर सदर टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून पाच महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला.
सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आगामी काळात सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सनस तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुनील रोकडे, केतन शिंदे आणि शुभम चव्हाण यांनी आवश्यक पुरावे सादर करून कामकाज पूर्ण केले





