Home » Shorts| ताजा खबरें # e paper » कंत्राटदारावर (आग्रोह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंदूर) ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याचे निर्देश- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

कंत्राटदारावर (आग्रोह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंदूर) ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याचे निर्देश- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Trending Photos

 

जळगाव, दिनांक 03  -Ankush tv18 news –

  • घटना: जळगाव शहराबाहेरील पाळधी ते तरसोद (असोदा) बायपास राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा भराव आणि एका बाजूचा भाग खचला आहे.
  • कारण: ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला (सुमारे ५-६ दिवसांपूर्वी) झालेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली.
  • परिस्थिती: पुलाच्या भिंतींमधून माती आणि काँक्रीटच्या प्लेटा बाहेर पडू लागल्याने पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यालाही मोठे तडे गेले आहेत.
  • वाहतूक: खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या बायपास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. सर्व वाहने जळगाव शहरातून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत, ज्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सुरुवातीला ही वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत बंद राहण्याचे आदेश आहेत.
  • कार्यवाही:
    • राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
    • केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठवून तांत्रिक पाहणी करण्याचे आणि निकृष्ट काम करणाऱ्या दोषी कंत्राटदारावर (आग्रोह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इंदूर) ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

: जळगाव शहरालगत पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे  खचला होता. या पुलाची राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाच्या संरचनेला झालेल्या नुकसानीची आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांनी संबंधित यंत्रणेला नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

पाहणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या पुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठविण्यात यावे, नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दुरुस्तीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच नागरिकांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.हा पूल अवघ्या वर्ष-दीड वर्षापूर्वीच बांधण्यात आला होता, त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुलाच्या परिसरातील परिस्थिती, वाहतुकीवरील परिणाम तसेच प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती  दिली. पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचेही यावेळी सांगितले. जळगावचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी तहसीलदार शितल राजपूत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]