Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जळगाव महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात आर्थिक गैरप्रकारांचा आरोप; महापौरांकडे निवेदन

जळगाव महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात आर्थिक गैरप्रकारांचा आरोप; महापौरांकडे निवेदन

Ankush tv18 news network

जळगाव महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात आर्थिक गैरप्रकारांचा आरोप; महापौरांकडे निवेदन

जळगाव : शहरातील घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात सुरू असलेल्या कथित गंभीर आर्थिक गैरप्रकारांविरोधात आज मा. महापौर दीपमाला मनोज काळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर लेखी निवेदन सादर करण्यात आले.

सादर केलेल्या निवेदनात जळगाव महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कचरा व घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ट्रॅक्टरमध्ये प्रत्यक्ष कचऱ्याऐवजी माती व मुरूम टाकून वजन कृत्रिमरित्या वाढवले जात असल्याचा गंभीर मुद्दा यामध्ये मांडण्यात आला.

महानगरपालिकेकडून प्रति टन सुमारे ₹1400 दराने देयक दिले जात असल्यामुळे, दररोज अंदाजे 100 टन अतिरिक्त कचरा दाखवून सुमारे ₹1,40,000 इतका अपहार होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकारामुळे महिन्याभरात कोट्यवधी रुपयांचा शासन निधी लुटला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, तसेच वजन काटे, जीपीएस प्रणाली व बिलिंग रेकॉर्डची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावर मा. महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

जनतेच्या पैशांचे रक्षण व महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता राखण्यासाठी तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा