ANKUSH TV18 NEWS NETWORK
JALGAON( ADV.VIJAY DANEJ
जळगाव महानगरपालिका निवडणूक 2025 – इच्छुक उमेदवारांना मुलाखती चे आयोजन
आगामी महापालिका निवडणूक ‘स्वराज्य शक्ती सेना’ स्वबळावर लढणार

येत्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ‘ स्वराज्य शक्ती सेना’ ने देखील निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आगामी महापालिका निवडणूक स्वराज्य शक्ती सेना पूर्ण ताकदीनिशी आणि ‘स्वबळावर’ लढणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.सर्वसामान्यांचे प्रश्न, शहराचा विकास आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर पक्ष मतदारांसमोर जाणार आहे. पक्षाच्या प्रमुख मा. करुणा ताई धनंजय मुंडे यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाईल. तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि जनसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या चेहऱ्यांना पक्षातर्फे संधी दिली जाणार आहे.या निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची लवकरच निवड प्रक्रिया आणि मुलाखती पार पडणार आहेत. मा. करुणा ताई मुंडे स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहेत.तरी, ज्या समाजसेवकांना, कार्यकर्त्यांना किंवा प्रतिष्ठित नागरिकांना स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून ही निवडणूक लढवायची आहे, त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी प्राजक्ता संजय तायडे – महिला जिल्हाध्यक्ष स्वराज्य शक्ती सेना ठिकाण: गोविंदा रिक्षा स्टॉप नयनतारा मॉल समोर विश्वकर्मा अपार्टमेंट बेसमेंट -8530488203 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.





