ANKUSH TV18 NEWS NETWORK
Jalgaon ( vijay danej ) नोटरी अधिवक्ता असोसिएशन जळगाव तर्फे जळगाव येथे जिल्हा सत्र न्यायालय येथील वकील संघात सकाळी 10 वाजता नोटरी वकीलांसाठी प्रथम कार्यशाळा घेण्यात आली
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव वकील संघाचे अध्यक्ष अँड सागर चित्रे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली

सदर कार्यक्रमात ज्येष्ठ मार्गदर्शक अँड प्रवीण झवर सर, अँड प्रदीप देशमुख सर, आणि अँड सुरेन्द्र काबरा सर यांनी नोटरी वकीलांना मोलाचे मार्गदर्शन केले
त्यांचा परिचय अँड आशिष पाटील यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड हेमंत भंगाळे यांनी केले
प्रस्तावना संस्थेचे जिल्हाध्यक्ष अँड नितिन जगताप यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अँड दिपाली भावसार यांनी केले
कार्यशाळेतील विषयान्वये व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे व उपस्थितांच्या प्रश्न-उत्तरा मुळे बऱ्याच नोटरी वकिलांचे कन्सेप्ट क्लिअर झाले सदर कार्यक्रमात जळगांवातील आणि जिल्ह्यातील नोटरी वकिल हजर होते
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी असोसिएशन चे उपाध्यक्ष अँड कैलाश भाटिया,अँड सुभाष तायडे ,सचिव अँड योगेश गावंडे, सहसचिव अँड प्रतिभा पाटील ,अँड युनस शेख ,अँड पद्मनाभ देशपांडे अँड अभिजीत लोखंडे, यांनी मेहनत घेतली तसेच यासाठी मोलाची मद्त अँड वैभव जोशी, अँड धीरज पांडे अँड दीपक महाजन अँड पंकज सवर्णे अँड उमेश सन्नासे आणि सुरेश पाटील यांनी केली.





