प्रतिनिधी – देवरी, ता. अकोट


अकोट उपविभागातील दहीहांडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत १५ हजार रुपये किमतीची मद्यसाठा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कावसा–कुटासा मार्गावर अरण्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आली असून, अलीकडील काळात होत असलेल्या कारवायांना यामुळे आणखी वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरूळ जऊळका–कावसा मार्गावर पोलिसांनी ९० एम.एल. क्षमतेच्या एकूण ३०० सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या मद्यसाठ्याची किंमत अंदाजे १५ हजार रुपये असल्याचे पोलीसांनी सांगितले.
या प्रकरणात रोहित देवेंद्र सिरसाट (वय २४, आगर ता. अकोला) याच्याविरुद्ध कलम ६५ ई अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय अधिकारी निखिल पाटील व ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





