Ankush tv18 news network
अकोट प्रतिनिधी : नीलकंठ वसू
अकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी बीज प्रक्रिया या विषयावर उपयुक्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक कृषि अधिकारी श्री. प्रकाश साबळे यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, बियाण्यांची निवड, प्रक्रिया पद्धती तसेच गुणवत्तापूर्ण बियाणे तयार करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
श्री. साबळे यांनी सांगितले की, योग्य बीज प्रक्रिया केल्यास पिकाची उत्पादकता वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. त्यांनी शेतकऱ्यांना बीज साठवणूक, रासायनिक प्रक्रिया आणि शासकीय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबतही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अनेक शेतकरी उपस्थित होते आणि त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.





