Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यास पोलीसांचा नकार, उलट तक्रारदार महिलेस जेलमध्ये टाकण्याची धमकी -फोन कॉल रेकॉर्डिंग उच्च अधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार ? ?

जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यास पोलीसांचा नकार, उलट तक्रारदार महिलेस जेलमध्ये टाकण्याची धमकी -फोन कॉल रेकॉर्डिंग उच्च अधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार ? ?

Trending Photos

ANKUSH TV18 NEWS NETWORK

KARAD- UTTAR KOPARDE –

उत्तर कोपर्डे येथे एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा हल्ला व जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना /  उलट तक्रारदार महिलेस जेलमध्ये टाकण्याची धमकी ? 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे येथे एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा हल्ला व जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तक्रारदार महिलेने संबंधित  पोलीसांचा  गुन्हा नोंदविण्यास नकार  , टाळाटाळ केल्याचा तसेच धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

“तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी फोनवरून गुन्हा दाखल केल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग तिच्याकडे उपलब्ध असून, ते उच्च अधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार आहे.”

तक्रारदार विमल शिवाजी चव्हाण
तक्रारदार विमल शिवाजी चव्हाण

तक्रारदार विमल शिवाजी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजता त्या आपल्या घरी एकट्या असताना आरोपी गौरी प्रवीण भोसले, सार्थक प्रवीण भोसले आणि समर्थ प्रवीण भोसले हे तिघे जबरदस्तीने घरात घुसले. यावेळी सार्थक व समर्थ यांनी त्यांच्या हातांना पकडून जमिनीवर पाडले व छाती दाबून विनयभंग केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर गौरी भोसले हिने त्यांच्या छातीवर बसून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच केस ओढून गंभीर मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तक्रारदार महिलेला चक्कर व अंधारी आल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेदरम्यान आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत सुमारे ८,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे पोत (पदक) जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिसरातील काही महिलांनी हस्तक्षेप करून त्यांना आरोपींपासून वाचविले.

तक्रारदार महिलेने याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, पोलीसांनी केवळ अदखल (NC) नोंद करून FIR दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. तसेच ए.पी.आय. चौधरी आणि संदीप कांबळे (पोलीस कॉन्स्टेबल) यांनी गुन्हा दाखल केल्यास उलट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या Lalita Kumari vs Government of Uttar Pradesh या ऐतिहासिक निर्णयाचा दाखला देत, संज्ञेय गुन्हा असताना FIR नोंद करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींना संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी अदखल नोंद रद्द करून जबरी चोरीसह संबंधित सदर कृत्य हे जबरदस्ती चोरी (Robbery) स्वरूपाचा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे व यासाठी BNS कलम 309/311  कलमान्वये FIR दाखल करण्याची, मागणी केली आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का आणि पीडित महिलेला न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा