Home » तंत्रज्ञान » अकोट तालुक्यात “उत्तम कापूस प्रकल्पा”अंतर्गत शेतकरी जनजागृती — हवामान बदल, कीड व्यवस्थापनावर एलईडी स्क्रीनद्वारे मार्गदर्शन

अकोट तालुक्यात “उत्तम कापूस प्रकल्पा”अंतर्गत शेतकरी जनजागृती — हवामान बदल, कीड व्यवस्थापनावर एलईडी स्क्रीनद्वारे मार्गदर्शन

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv18 news network

    प्रतिनिधी – निळकंठ वसू
अकोट – तालुका अकोट येथील आलेवाडी, देवरी, रौदळा या गावांमध्ये “उत्तम कापूस प्रकल्पा”अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हवामान बदलाचे परिणाम, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, तसेच मित्र कीड आणि शत्रू कीड यांची ओळख व प्रभावी व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने माहिती सादर करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमात क्षेत्रप्रवर्तक श्री. संतोष बोरकर आणि श्री. विजय डिक्कर यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी उपयुक्त माहितीचा लाभ घेतला.

हा उपक्रम शेतकऱ्यांच्या कीड व्यवस्थापन ज्ञानात वाढ घडवणारा ठरला असून, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]