Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जळगावमध्ये अवैध धंदे, जुगार, दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर लगाम बसणार? पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धडक कारवाई सुरू

जळगावमध्ये अवैध धंदे, जुगार, दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर लगाम बसणार? पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धडक कारवाई सुरू

Trending Photos

ankush tv18 news network

jalgaon

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून मा. श्री. श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या रुजू झाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे दिसून येत आहे.

मात्र, काही ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.एस.पी.) स्तरावर अपेक्षित तितकी आक्रमक कारवाई अद्याप सुरू झालेली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलीस अधीक्षक धिवरे यांनी अवैध धंदे, जुगार, दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दल अधिक सक्रिय होत असून, काही भागांमध्ये छापेमारी आणि तपास मोहिमा राबवण्यात येत आहेत.

नागरिकांचा विश्वास आहे की, या धडक कारवायांमुळे जळगावमधील अवैध धंद्यांना मोठा आळा बसेल आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल. येत्या काळात डी.एस.पी. स्तरावरही तितक्याच कठोर आणि धाडसी कारवाया सुरू झाल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांनीही बेकायदेशीर कृत्यांविरोधात माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

सन-२०२६ मध्ये जळगांव शहर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्यात एकूण १०० कर्कश आवाज करणारे दुचाकीचे सायलेन्सर वाहतुक शाखेच्या अंमलदारांनी चेक केले असता ते सबंधीत कंपनीने बसविलेले नसून दुचाकी विकत घेतल्यानंतर बाहेरुन कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कर्कश सायलेन्सरचा स्थानिक रहिवासी, जेष्ठ नागरीक, शाळकरी विद्यार्थी यांना त्रास होत असल्याने त्या कर्कश आवाजामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून सायलेन्सर पोलीसांकडून जप्त करण्यात आले होते. तसेच जळगांव शहरामध्ये अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकीस्वार यांच्याकडून २५० फॅन्सी नंबर प्लेट ताब्यात घेण्यात आले होते. आज रोजी मा.श्री. श्रीकांत धिवरे सो, पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या आदेशान्वये रोड रोलरच्या सहाय्याने चेपून निकामी करण्यात आले आहे.   जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण पाहता सन-२०२५ मध्ये एकूण अपघात ९३९ झाले असून त्यात ४५० प्राणांतिक अपघात असून त्यात सुमारे ४८७ जणांचा बळी गेलेला आहे. मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार राष्ट्रीय महामार्गावर तसेच इतर रस्त्यावर अपघातात होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी होणे करीता मोटार वाहन कायद्यान्वये विना हेल्मेट, ट्रीपल शीट, अल्पवयीन वाहन चालक, रॅश ड्राईव्हींग, बेशिस्त वाहन चालक, नो पार्कीग, अवैध प्रवासी वाहतूक, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईड वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, कर्कश आवाज करणारे सायलेन्सर अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाई करणेकामी विशेष पथक नेमून जास्तीत जास्त नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर कारवाई करणेकामी मा.श्री. श्रीकांत धिवरे सो, पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके नेमण्यात आली असून, सदरची मोहिम यापुढे देखील नियमीत सुरु राहणार असून तीव्र करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन करुन होणाऱ्या कारवाई पासून सावध रहावे.  तसेच जळगांव जिल्हा हा शुन्य प्राणहानी जिल्हा स्तरावर उपाय योजना म्हणून रस्ता सुरक्षा समिती नेमण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून वरील प्रमाणे जनजागृती करून कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

जळगाव जिल्हयातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध जळगाव पोलीस दलाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा.श्री. श्रीकांत धिवरे सो. यांच्या थेट मार्गदर्शनाखाली दिनाक २४/०४/२०२६ रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यात ०४ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. सदरची कारवाई सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २५/०४/२०२६ रोजी देखील करण्यात आली आहे. पहाटे ०५.०० वाजे दरम्यान जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी कारवाई करण्यात आली.   सदर कारवाईत मोहिमेत जळगाव जिल्हयात अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा