पुणे प्रतिनिधी शंकर जोग.
प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय विभागाच्या वतीने
गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध व भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी.

गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (NRI CELL) अनिवासी भारतीय विभाग च्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धनंजय तुकाराम बुद्धिवंत म्हणाले गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीच्या महाराष्ट्रात आणि देशभरात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच देशात गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत या प्रकरणाची सखोल चौकशी करत त्याला फाशीची शिक्षा द्यावी व रूपाली चाकणकर यांना देखील या प्रकरणात सह आरोपी करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





