पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

पुणे कॅन्टोन्मेंट मधील भीमपुरा भागातील नागरिकांच्या अनेक वर्ष जुन्या ड्रेनेज लाईन बदलून नवीन लाईन तसेच पाण्याच्या नवीन लाईनच्या कामाला अखेर यश आले आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या आमदार निधीतून भीम पुरा गल्ली क्रमांक 1 ते 21 या सर्व ठिकाणी नवीन पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच ड्रेनेज लाईनचे विविध कामाचे शुभारंभ आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते नुकताच झाले. यावेळी पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक निलेश आल्हाट,ॲड, प्रशांत यादव, दिलीप गिरमकर, सचिन मथुरावाला, शैलेश बिडकर अमित वोरा, संतोष इंदूरकर, विनायक काटकर पुरुषोत्तम पिल्ले संजय व्हावळ, सोनी भिंगेवाड, नीता पत्की, भारतीय अंकलेलू, नंदू मोटाडू, वैष्णवी झुंबरे,मनीष परदेशी, हरीश बनसोडे, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले होते. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष शशिधर पुरम यांनी सूत्रसंचालन केले तर आभार ज्ञानेश्वर कांबळे यांनी मानले.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा