Ankush tv18 news network
जळगाव शहरातील आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे परिवारासह त्यांचे गावी धानवड येथे गेले होते. सकाळी त्यांच्या बंद घराचा दरवाजा उघड़ा असले बाबत शेजा-यांनी फोन करुन कळविल्याने ते जळगाव येथे पोहचुन घराची पाहणी केली असता त्यांच्या घरातील लाकडी कपाट उघडे दिसुन सदर कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसुन न आल्याने घरात घरफोडी झाल्याचे खात्री झाल्याने त्यांनी एमाआयडीसी पोलीस स्टेशन गुरन ७९/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०५(a), ३३१ (३) (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीतांना वर नमुद पथकाने मध्यप्रदेश राज्यात जावुन खंडवा जिल्हातील पुनासा तहसिल भागातील इनपुन पुर्नविकास याठिकाणी सापळा रचुन आरोपी यांना दि.०१/०२/२०२६ रोजी शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस करता त्यांनी त्यांचे नाव १) सुखदेव रामसिंग टाक, वय ३६, रा इनपुन पुर्नविकास, पोस्ट मंधाता, तहसिल पुनासा, जि खंडवा मध्यप्रदेश, २) आकाश दिनेश वाधे, वय १९ रा. इनपुन पुर्नविकास पोस्टे मंधाता, तहसिल पुनासा, जि. खंडवा व एक विधीसंघर्ष बालक यांनी सदरच्या गुन्ह्या केल्याची कबुली दिली. सदर आरोपीतांकडून गुन्ह्यात चोरी गेलेला संपुर्ण मुद्देमाल १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
तसेच सदर आरोपीतांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले सुमारे ४,००,०००/- रु किमतीचे चारचाकी वाहन व वाहनात मिळुन आलेले साहित्य लोखंडी पकड (पेंचिस), स्क्रू ड्रॉयव्हर, एक लहान चाकु असा मुद्देमाल गुन्ह्याकामी जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपीतां मा न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास पोहेकों किरण चौधरी, पोकॉ योगेश घुगे हे करीत आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा.नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.





