Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » भुसंपादीत जागेची मालक दाखवुन -शासनाची फसवणुक करणारी गुन्ह्यातील आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील जिल्हापेठ पो. स्टे. चे जाळयात

भुसंपादीत जागेची मालक दाखवुन -शासनाची फसवणुक करणारी गुन्ह्यातील आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील जिल्हापेठ पो. स्टे. चे जाळयात

Trending Photos

Ankush tv18 news network

Jalgaon

भुसंपादन विभाग जळगाव यांचे कडेस भुसंपादीत जागेची मालक दाखवुन भुसंपादीत जागेची शासनाकडील १६,९७,३२६/- रक्कम रुपये बँक खात्यात घेवून शासनाची फसवणुक करणारी महिला जिल्हापेठ पो. स्टे. चे जाळयात

उपरोक्त विषयान्वये जिल्हापेठ पो.स्टे.ला CCTNS No.३२४/२०२५ भादवि कलम ४२०,४६८,४७१ प्रमाणे दिनांक १९/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील, वय ५९, रा. ज्ञानेश्वर नगर देवळाली पाथर्डी रोड नाशिक हिने मौजे नशिराबाद तालुका जळगाव येथील गट नं. २२०६ मध्ये प्लॉट नं. ३ व ४ हा श्रीमती पुष्पा देवराम जावळे, वय ७० रा.प्लॉट नं.२० गणेश कॉलनी जळगाव यांची मालकीचे असून त्यामधुन सन २०११ मध्ये अनुक्रमे भुसंपादन निवाडा क्र.२४ व २५/२०११ प्रमाणे १५० चौ. मह तसेच सन २०१३ मध्ये भुसंपादन निवाडा क्रमांक ०६/२०१३ अन्वये प्लॉट नं.३ व ४ यातुन ३३८ चौ.मी. असे एकुण ४८८ चौ.मी. क्षेत्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र.६ चे चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आलेले असून दिनांक २१/०८/२०१८ ते २३/०८/२०१८ या कालावधीत त्या मोबदल्याची एकुण रक्कम १६,९७,३२६/- रुपये रक्कम मिळण्यासाठी आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील यांनी खोटे कागदपत्र सादर करुन मीच पुष्पा देवराम जावळे मालक असल्याचे भासवुन शासनाकडून १६,९७,३२६/- रक्कम रुपये शासनाकडून अकाऊंट वर आर.टी.जी.एस. द्वारे घेवून शासनाची फसवणुक केल्या वरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा तपास हा पोउपनिरी श्री गोपाल देशमुख हे करीत आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील हिने तिचे नाव पुष्पा देवराम जावळे असे दाखवून खोटे कागदपत्र देवुन खाते उघडुन बँक खात्यात रक्कम घेतली होती त्या बँकेतील कागदपत्र प्राप्त करुन तसेच फिर्यादीने त्यांचे कार्यालयाकडील असलेले कागदपत्र व फोटो या आधारावर गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळवून त्याचे कडून आरोपीची ओळख पटवुन आरोपी सुनंदा मोतीलाल पाटील, वय ५९, रा.ज्ञानेश्वर नगर देवळाली पाथर्डी रोड नाशिक हिस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून मा.न्यायालया समोर हजर केले असता मा. न्यायालयाने सदर महिला आरोपी हिची ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक सो, जळगाव, मा. नितीन गणापुरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव, प्रदीप ठाकूर, पोलीस निरीक्षक, जिल्हापेठ पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी श्री गोपाल देशमुख, पोह महेश महाजन, पोकों ईश्वर लोखंडे, पोकों प्रशांत लाड, पोकों चंद्रकांत पाटील, मपोको छाया पाटीलू, वैशाली सादरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा