Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » केहाळ वडगाव येथे नाली बांधकामात अनियमितता; तक्रारदार ग्रामस्थांना धमकावल्याचा आरोप

केहाळ वडगाव येथे नाली बांधकामात अनियमितता; तक्रारदार ग्रामस्थांना धमकावल्याचा आरोप

केहाळ वडगाव येथे नाली बांधकामात अनियमितता; तक्रारदार ग्रामस्थांना धमकावल्याचा आरोप

मंठा | प्रतिनिधी

मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या नालीच्या बांधकामात बोगसपणा व अनियमितता होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून काम नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली असता, तक्रारीची दखल घेण्याऐवजी संबंधितांकडून ग्रामस्थांवरच दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार मागे घ्यावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सदर प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. शासनाचा निधी ग्रामविकासासाठी येत असताना जर त्याचा गैरवापर होत असेल तर याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नालीच्या बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच ग्रामस्थांना धमकावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित ठेकेदार यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा