Home » महाराष्ट्र » जळगावात मुख्यमंत्री फडणवीसांचा रोडशो – जळगावात 75 पैकी फक्त 25 जागांवरच भाजप यशस्वी ठरू शकते? – नागरिकांमध्ये चर्चा रंगली

जळगावात मुख्यमंत्री फडणवीसांचा  रोडशो – जळगावात   75 पैकी फक्त   25  जागांवरच भाजप यशस्वी ठरू शकते?  – नागरिकांमध्ये चर्चा रंगली

Trending Photos

ANKUSH TV18 NEWS NETWORK

JAGALON-

जळगावात मुख्यमंत्री फडणवीसांचा  रोडशोला पाठ फिरवल्याची चर्चा ?

“मुख्यमंत्री आले तरी आमच्या प्रश्नांवर काहीच तोडगा नाही. म्हणूनच लोकांनी बाहेर येणं टाळलं.” 

जळगावात   75 पैकी फक्त   25  जागांवरच भाजप यशस्वी ठरू शकते?    नागरिकांमध्ये चर्चा रंगली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगावातील रोडशो मोठ्या तयारीनिशी आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या रोडशोला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शरदतून जळगावकरांनी या रोडशोला पाठ फिरवल्याची चर्चा आता शहरभर रंगू लागली आहे.

–  शांत रस्ते
– मोजकीच गर्दी
– पोलिस बंदोबस्त जास्त, नागरिक कमी
– फक्त कार्यकर्त्यांची उपस्थिती
– रिकामे फूटपाथ

जळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोडशो काढण्यात आला. मात्र दुतर्फा नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. अनेक ठिकाणी नागरिकांनी घरातून बाहेर न पडत शरदतूनच या रोडशोला पाठ फिरवल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.

– काही ठिकाणी थांबलेला ताफा     – घोषणा देणारे मोजके कार्यकर्ते

Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.

YouTube privacy policy

If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.

या रोडशोच्या फ्लॉपनंतर भाजप सरकार निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत भाजपचे अपेक्षित उमेदवार निवडून येणार नाहीत, असा सूर जळगावात उमटताना दिसतोय.

जळगावात सध्या चर्चा आहे की 75 पैकी केवळ   25  जागांवरच भाजपला यश मिळू शकतं. उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवार किंवा विरोधी पक्षांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

– चहाच्या टपऱ्यांवर चर्चा
– नागरिक गटागटाने बोलताना
– सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

एकंदरीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा जळगावातील रोडशो फ्लॉप ठरल्याचं चित्र दिसून येत असून, याचे थेट पडसाद आगामी निवडणुकीत उमटतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा