ANKUSH TV18 NEWS NETWORK
मा मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांचा रोड शो-
सत्ताधाऱ्यांवर थेट बोट : “खड्डेराज” उघड, जळगावात सरकारची नामुष्की!
जळगाव | प्रतिनिधी
विकास, स्मार्ट सिटी आणि दर्जेदार पायाभूत सुविधांच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा जळगावमध्ये उघडा पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शहरातील रस्त्यांवरील भलेमोठे खड्डे पाहून खुद्द मुख्यमंत्र्यांनाच धक्का बसावा, ही बाब सत्ताधारी सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.
If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.
सूत्रांच्या माहितीनुसार, जळगावमधील रस्त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्री प्रचंड संतप्त झाले असून जिल्हाधिकाऱ्यांना थेट तोंडी आदेश देण्याची वेळ सरकारवर आल्याचे सांगितले जात आहे. हा संताप म्हणजेच स्थानिक सत्ताधाऱ्यांचे अपयश, भ्रष्ट कामे आणि प्रशासनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप होत आहे.
महिनोन्महिने नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त, अपघातात जखमी होत असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र उद्घाटन, बॅनरबाजी आणि श्रेयवादात मश्गुल होते, असा थेट आरोप आता उघडपणे केला जात आहे. “मुख्यमंत्री येतात तेव्हाच रस्त्यांची आठवण होते का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अचानक डागडुजी सुरू झाली असली, तरी हा प्रकार म्हणजे दाखवण्यासाठीची मलमपट्टी असल्याची टीका होत आहे. जळगावच्या रस्त्यांची अवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या विकासाच्या दाव्यांवर जोरदार तमाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.





