Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » मा. उपराष्ट्रपती यांचा जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा

मा. उपराष्ट्रपती यांचा जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा

Trending Photos

ANKUSH TV18 NEWS NETWORK

JALGAON

जळगाव, भारताचे मा. उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची पूर्वतयारी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपवनसंरक्षक राम धोत्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी सांगितले की, मा. उपराष्ट्रपती यांचे दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ६.०० वाजता रेल्वेमार्गे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून त्यानंतर अजिंठा शासकीय विश्रामगृहा कडे प्रयान होणार आहे. तेथून सकाळी ८.०० वाजता ते अजिंठा छत्रपती संभाजी नगर कडे प्रयाण करणार आहेत. या प्रस्तावित दौऱ्यासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दौऱ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात पोलीस विभागाने रेल्वे स्थानक परिसर तसेच शहरात पुरेसा बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. जळगाव महानगरपालिकेने रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, अतिक्रमण हटविणे आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता व वाहतूक नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी. नॅशनल हायवे यंत्रणेने ज्या ठिकाणी रस्ते नादुरुस्त आहेत त्या ठिकाणी तात्काळ रस्ते दुरुस्त करावेत,जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

या बैठकीस रेल्वे, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे जळगाव महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, अन्न व औषध प्रशासन आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा