Ankush tv18news network
date-12/10/2025 Jalgaon
अवैध गांजा कब्जात बाळगणारा हर्षल संतोष गारुंगे स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद……

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, धरणगांव ते चोपडा जाणा-या रोडावरील शासकीय आट.टी.आय जवळ एक इसम अवैध गांजा कब्जात बाळगत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरुन
मिळालेल्या बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच धरणगांव पो.स्टे प्रभारी अधिकारी पो.नि. श्री संतोष पवार व अंमलदार यांनी एकत्रीत येवुन बातमीप्रमाणे धरणगांव ते चोपडा जाणा-या रोडावरील शासकीय आट.टी.आय जवळ हिरव्या रंगाचे गोणीत सुका पालपाचोळा गांजा बाळगणारा इसम हर्षल संतोष गारुंगे वय-२० वर्षे रा-जळगांव असे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन १,८८,६२५/- रु.कि.चा सुका पालापाचोळा असलेला ७ किलो ५४५ ग्रॅम वजनाचा गांजा, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील १,८८,६२५/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचे विरुध्द धरणगांव पो.स्टे ला CCTNS NO ०३९२/२०२५ NDPS अँक्ट ८ (C), २० (B) (२), २० (ब), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही.मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परीमंडळ, मा. अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग, मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा जळगांव मा. श्री संतोष पवार धरणगांव पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोउ.निरी. श्री जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु बि-हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, सर्व नेमणुक. स्था.गु.शा जळगांव तसेच धरणगांव पोलीस स्टेशनचे पो.उनि. संतोष पवार, पोह. सुधीर, पोकॉ, संदिप पाटील, किशोर भोई, अशांनी केली आहे.





