Home » मुंबई बातम्या » भारत पेट्रोलिअम जळगाव येथून आयशर MH-17- BYBY- 3737 वाहनामधील ३४२ सिलेंडर पैकी ६१ नग सिलेंडरची चोरी – वाहन जप्त .

भारत पेट्रोलिअम जळगाव येथून आयशर MH-17- BYBY- 3737   वाहनामधील ३४२ सिलेंडर पैकी ६१ नग सिलेंडरची चोरी – वाहन जप्त .

Trending Photos

Ankush tv18 news network

MH-17- BYBY- 3737   वाहनामधील ३४२ सिलेंडर पैकी ६१ नग सिलेंडरची चोरी

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील फिर्यादी यांनी भारत पेट्रोलिअम जळगाव येथून रिफीलींग करुन ३४२ नग सिलेंडर ट्रक वाहनामध्ये भरुन दि.१४/११/२०२५ रोजी रात्री सदर भागात पार्किंग केले होते. दि.१५/११/२०२५ रोजी सकाळी फिर्यादी हे सदरचे सिलेंडर भरलेले वाहन घेवुन जाणेकामी आले असता जागेवर वाहन दिसले नसल्याने आजुबाजुला शोध हे सदरचे वाहन रस्त्याच्या कडेला उभे दिसले व सदरच्या वाहनामधील ३४२ सिलेंडर पैकी ६१ नग सिलेंडरची चोरी झाल्याचे खात्री झाल्याने एमाआयडीसी पोलीस स्टेशन गुरन ८४८/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त वातमिदारांकडून गोपनिय बातमी काढून सदर गुन्हा करणा-या आरोपीतांची ओळख पटवुन सदर आरोपीतांची माहिती काढून सदर गुन्हा करणारे आरोपीतास जळगाव शहरातील एमआयडीसी भागात सापळा रचुन शिताफीने दि.१८/११/२०२५ रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने त्यांचे नाव शेख फिरोज शेख याकुब, रा नशिराबाद जळगाव असे सांगुन त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक रा उस्मानिया पार्क, जळगाव याचेसोबत मिळुन केला असले बाबत सांगितले. सदर गुन्हात चोरी केलेला एकुण १,२२,०००/-रु किमतीचा ६१ नग गॅस सिलेंडर हंड्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले सुमारे ५,००,०००/- रु किमतीचे आयशर वाहन देखील जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव चे पोनि बबन आव्हाड यांनी आवश्यक सूचना देवून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकों नितीन ठाकुर, पोकों किरण पाटील, पोकों शशिकांत मराठे, अशांनी केली आहे.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा