Ankush tv18 news network
Jalgaon

जळगाव दि.३ – जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य सरकारच्या योजना व उपक्रमांच्या प्रगतिशील महाराष्ट्र २०२५ भव्य प्रदर्शन दिनांक ३, ४ आणि ५ नोव्हेंबर २०२५ पासून शिवतीर्थ, (जी एस ग्राउंड) जळगाव येथे आयोजित करण्यात आले असून या भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन आज दिनांक 3 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयजी सावकारे, खासदार अँड. उज्वलजी निकम, आ. अनिलजी पाटील, आ. सुरेशजी भोळे (राजू मामा), आ. मंगेश दादा चव्हाण, आ. किशोरजी अप्पा पाटील, आ. अमोलदादा पाटील, आ. प्रा. चंद्रकांतदादा सोनवणे, आ. अमोलदादा जावळे, आ. चंद्रकांतजी पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी (पश्चिम) मा. चंद्रकांत बाविस्कर (पुर्व) व मा. दिपक सूर्यवंशी (जिल्हा महानगर) तसेच पदाधिकारी व केंद्र/राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित आहेत. या प्रदर्शनामध्ये ५४ विविध प्रकारचे शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात आलेले असून यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग, विमा, आरोग्य कल्याण , कृषी, फलोत्पादन, हातमाग, हस्तकला, अंतराळ, विज्ञान, अणुऊर्जा, वाणिज्य, व्यापार, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास, कृषी, पशुसंवर्धन, गृहनिर्माण व शहर विकास अशा विविध प्रकारच्या माहिती या ठिकाणी आहेत.





