Ankush tv18 news network
मानवत / बातमीदार.
अनिल चव्हाण
मानवत तालूका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्या मध्ये मानवत तालूक्यातून 40 ते 50 नव युवकांनी प्रवेश करत युवा मोर्चा बळकट करण्यासाठी आपले योगदान दिले. प्राचार्य अनंत गोलाईत हे भाजपाचे तालुका अध्यक्ष असताना शेकडो युवकांनी प्रवेश केला.
त्याच कामाची पावती म्हणून केलेल्या कामाच खरोखर सार्थक झाल्या सारखं वाटलं बोलताना कार्यक्रमाचा समारोप करतांना युवा मोर्चा अंतर्गत हा जिल्ह्यातील पहिला पक्ष प्रवेश आपल्या मानवतला झाला ही मानवत तालूका भाजपा युवा मोर्चासाठी अभिमानाची बाब आहे. येणाऱ्या काळात ही अजून पक्ष प्रवेश करून युवा मोर्चा बळकट करु असं आश्वासन दिल.
आजच्या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा बँकेच्या संचालिका प्रेरणाताई वरपुडकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रभाकर शिंदे, मंडळ अध्यक्ष हरिभाऊ निर्मळ, शहर अध्यक्ष संदीप हंचाटे जिल्हाउपाध्यक्ष प्राचार्य अनंत गोलाईत, सरचिटणीस दादासाहेब भोरकडे, माणिकराव मोगरे , सुभाषराव निर्वल, अभिजित उन्हाळे यांच्या सह शहरी व ग्रामीण भागातील युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.