Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
येणाऱ्या पुणे महा नगरपालिका निवडणुका संदर्भात पुणे शहरातील विविध वार्ड, प्रभागात आजाद समाज पार्टी तर्फे कोंढवा पुणे येथे महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची लाभ मिळावा यासाठी माहिती व मोफत प्रशिक्षण कार्यक्रम कोंढवा येथील वेलकम हॉल मध्ये घेण्यात आले, यामध्ये ब्युटी पार्लर कोर्स, शिवण क्लास कोर्स, मेहंदी क्लास कोर्स, पाककला कोर्स, अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली, या कार्यक्रमांमध्ये सुमारे 800 महिला उपस्थित होते, मागील दहा वर्षापासून आजाद समाज पार्टी सामाजिक कार्य करत आहे या उपक्रमाचे महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिलांना मोफत शिलाई मशीन देणार अशी माहिती आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी दिली, या कार्यक्रमाला आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष एडवोकेट सुलतान फते अली शहा, पुणे जिल्हा अध्यक्ष भीमराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष सैफ शेख, आदि यावेळी उपस्थित होते,