Ankush tv18 news netwrok
अकोट, प्रतिनिधी: निळकंठ वसू, अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. नरेंद्र बेंबरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नवीन नियुक्ती नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे झाली आहे.
डॉ. बेंबरे यांनी अकोट येथे कार्यरत असताना नगरपरिषदेच्या विविध विकासकामांवर भर दिला होता. शहर स्वच्छता मोहिम, पाणीपुरवठा योजना तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्परतेने लक्ष देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले.
त्यांच्या बदलीनंतर अकोट शहरात नवा मुख्याधिकारी कोण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. डॉ. बेंबरे यांना अकोट मधील नागरिक, नगरपरिषद कर्मचारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.