पुणे प्रतिनिधी शंकर जोग.
पीडित महिलेवर अत्याचार बलात्कार करून खंडणी मागून माहराण करणारे आरोपी अँड.सुनील माने याच्यावर कठोर कारवाई करून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम आणि प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय समोर आंदोलन दरम्यान करण्यात आली.
आरोपी ॲड. सुनील माने याने पिंपरी चिंचवड मध्ये एका पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून, बलात्कार, फसवणूक, खंडणी, माहराण, जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक शारीरिक छळ करण्यात आल्याचे उघड झाली आहे. महिलांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. दलित पॅंथर या संघटनेच्या वतीने पीडित महिलेला न्याय देण्यासाठी या गुन्ह्यामध्ये फरार असणारे आरोपींना तत्काळ अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम आणि प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय समोर आंदोलन दरम्यान केली आहे.
पीडित महिलेला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावा. लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास दलित पॅंथर संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी दिला. यावेळी आंदोलनाला प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ साळवे, पुणे संपर्कप्रमुख बंडू गवळी, पुणे शहर युवती अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, पुणे शहर युवक अध्यक्ष कुणाल साठे, रोहित कांबळे, सुनील अगरे , कविता डाडर, अजय वंदिले, प्रियंका खरात, मिलिंद सरवदे, अजिंक्य म्हस्के, माऊली गरुड, विक्रम पवार, विक्रम गरुड, रेखाताई सूर्यवंशी, अनुराधा अवघडे, आदी उपस्थित होते.





